देवदानवां नरें निर्मिलें . . .
आमच्या देशात आजही यंत्रसंस्कृतीपेक्षा मंत्रसंस्कृतीचाच पगडा अधिक आहे. आणि ती केवळ ब्राह्मणांपुरतीच मर्यादित नाही. दर मंगळवारी गणपतीपुढे नारळ, उदबत्त्या, पेढ्यांचे पुडे घेऊन तास न् तास हजारो माणसे उभी राहतात, ती काही फक्त ब्राह्मणच नसतात. ही माणसे वैयक्तिक नवस आणि परलोकात स्वतःची सोय करू पाहतात. … पण अशी रांग इस्पितळाच्या पुढल्या पेट्यांतून स्प्रया-सव्वा रुपया टाकायला कधी …